देविदास शर्मा नागपूर सिटी आयकॉनिक अवॉर्ड २०२६ पुरस्काराने सन्मानित

खामगाव नितेश मानकर :- येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांची एकता फाऊंडेशन सामाजिक संघटनेतर्फे आयोजित ‘नागपूर सिटी आयकॉनिक अवॉर्ड २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील निःस्वार्थ आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत २९ ऑगस्ट रोजी नागपूर येथील रविभवन सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके, एकता जय निधी लिमिटेड नागपूर आणि ग्लोबल एकता मीडिया न्यूज चॅनेल यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. राष्ट्रविकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

देविदास शर्मा हे मागील २६ वर्षांपासून धर्मसेवा तसेच गरीब व वंचित समाजाच्या हितासाठी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत आहेत. श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून अन्नदान, गरजूंना ब्लँकेट वाटप, पक्ष्यांसाठी पाणपोई व पाणीपात्र वाटप यासह विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना राष्ट्रीय भारत गौरव सर्वोच्च सन्मान, राष्ट्रीय महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र राज्य बहुजन समाज रत्न, महाराष्ट्र विश्वकर्मा समाज रत्न, छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव, इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५, नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५, सेवा गौरव, खामगाव अभिमान, महाराष्ट्र आदर्श समाजसेवक आणि महाराष्ट्र लोकनायक पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم