“संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा । एक तृण दानिता, मेदिनीमध्ये कणस होते ॥”
श्री गजानन महाराज उपासना परिवारातर्फे १ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानेवेद्य
खामगाव : आदर्श नगर येथील श्री गजानन महाराज उपासना परिवाराच्या वतीने श्रींच्या पालखी आगमनाप्रीत्यर्थ यंदाही भक्तिभावाने १ लाख ५१ हजार १११ मोदकांचा महानेवेद्य अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, या पवित्र सेवाकार्यात भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संकल्पपूर्तीसाठी भक्त आपल्या इच्छेनुसार किमान २१ किंवा त्यापेक्षा अधिक मोदक अर्पण करू शकतात. सर्व मोदक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुख्य संकलन केंद्रावर जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे. श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या दिंडी मार्गावर या मोदकांचा प्रसाद भक्तांना वितरित करण्यात येणार आहे.
मोदक तयार करण्यासाठी सारणासाठी किसलेले खोबरे/खोबऱ्याचा कीस, पिठीसाखर व वेलची पावडर, तसेच आवरणासाठी मैदा किंवा रवा वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. स्वच्छ खाद्यतेलात तळलेले मोदक तयार करून दिल्यास ते साधारण ६ दिवस उत्तम प्रकारे टिकतात, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
मोदक मुख्य संकलन केंद्र – खामगाव
सौ. सुवर्णा जसवंतराव चव्हाण,आदर्श नगर, खामगाव
संपर्क : ८२७५० २८६५२
“संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा । एक तृण दानिता, मेदिनीमध्ये कणस होते ॥” या भावनेतून भक्तांनी या महानेवेद्याच्या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गजानन महाराज उपासना परिवाराने केले आहे.

Post a Comment