“विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊँचा रहे हमारा”

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी खामगाव येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या तिरंगा मोटरसायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी केले आहे.


देशासाठी, आपला तिरंगा  विश्वांत उंच ठेवण्यासाठी “विजयी विश्व़ तिरंगा प्यारा झेडा उंचा रहे हमारा” असे म्हणत़ लाखो राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हजारो फासांवर चढले, हजारोंनी आपल्या निधड्या छातीवर गोळ्या झेलून आपल्या प्राण्याची आहुती दिली आहे.  त्यांच्या बलीदानाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व राष्ट्र भक्तांवर आहे.  “एक दिवस देशासाठी !  एक दिवस आपल्या तिरंग्यासाठी !” या संकल्पनेतून देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येते. आपल्या खामगाव शहरात देखील गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या तिरंगा रॅलीत हजारोंच्या संख्येने राष्ट्रभक्त़ नागरीकांनी सहभागी  व्हावे असे आव्हान खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार ऍड. आकाशदादा फुंडकर यांनी केले आहे.


गुरुवार  दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम ना.ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात निघणारी ही रॅली, महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मॉ जिजाऊ आईसाहेब यांना अभिवादन करून तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वंदन करून ही रॅली भुसावळ चौक,अर्जुन जल मंदिर,जगदंबा चौक, श्रद्धा ज्वेलर्स, फरशी,भगतसिंग पुतळा, एकबोटे चौक, सकळकळे कॉम्प्लेक्स या मार्गाने भाजपा कार्यालय समोर या तिरंगा रॅलीचा  राष्ट्रगीताने समारोप करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post