नॅशनल हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!



खामगाव: स्थानिक श्री अ खि नॅशनल हायस्कूल व ज्यू कॉलेजचा गुणगौरव सोहळा देवजी खिमजी मंगल कार्यालयात दि 8 ऑगस्ट 2026, शनिवारी दुपारी 2 वाजता सोत्साह संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता दहावीच्या व बारावीच्या बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या, एन सी सी, चित्रकला परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त, आय आय टी प्रवेशित, क्रीडा क्षेत्रात राज्य स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकूण 66 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार शाळेचे माजी विद्यार्थी छ संभाजीनगर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ विशाल पाटील व नागपूर येथील जी एस टी उपायुक्त डॉ प्रतीक राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील विविध विषयात पी एच डी मिळविणाऱ्या तीन शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ विशाल पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या जीवनात नॅशनल हायस्कूलच्या शिक्षकांचे, आईवडिलांचे स्थान सर्वोच्च असल्याचे सांगितले. दुसरे प्रमुख पाहुणे डॉ प्रतीक राठोड यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला. अभ्यास कसा करावा याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नॅशनल हायस्कूलच्या गुणवंतांचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या सौ नंदा उदापूरकर यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री दिनेशभाई संघवी यांनी भूषविले.

सूत्र संचलन सौ बुरंगी व सौ भागवत यांनी तर पुरस्कार वाचन सौ नारायणन, सौ घाटे, सौ कुलकर्णी, श्री दलाल यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्या कु सोनटक्के यांनी.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व घटकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post