*श्री. तानाजी व्यायाम शाळेचा सामजिक उपक्रम.*
स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना भोजन वाटप
खामगाव : श्री. तानाजी व्यायाम शाळेचे दिवंगत अध्यक्ष, आदरणीय स्व. भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टिळक राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन वाटप करण्यात आले. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सामाजिक कार्याची व समाजसेवेची प्रेरणा पुढे नेत विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षा पासुन हा उपक्रम राबविण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि गरजु कलावंत विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी जपत श्री. तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
या प्रसंगी टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे अजबे दांपत्य व प्रसाद ओंकारआप्पा तोडकर यांचे हस्ते स्व.भाऊसाहेबांच्या फोटोचे पुजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी श्री. तानाजी व्यायाम शाळेचे कार्यकर्ते पापा मुक्ते मयुर घाडगे, संकेत बागडे, ओम पडोळे, शंतनु मगर, सार्थक वाघ, संकेत घाडगे, मोहित गलवाडे, गौरव चव्हाण, आदित्य मोरे, अभिजीत मुळीक, रोहित पवार, समर्थ शिंदे, ओम शिंदे, अथर्व वाघ, आनंद घाडगे, कृष्णा जमोदे, कृष्णा सुकाळे, ओम राऊत सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्ष आकाश दादा फुंडकर (कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अकोला जिल्हा) व सचिव श्री. ओंकारआप्पा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Post a Comment