श्री परमहंस तेजस्वी महाराज संस्थान वरोडीच्या पायी दिंडी सोहळ्याचे खामगावात भक्तीमय वातावरणात स्वागत

​खामगाव:( नितेश मानकर )श्री परमहंस तेजस्वी महाराज संस्थान वरोडी (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) यांच्या वतीने आयोजित 'वरोडी ते शेगाव' पायी दिंडी सोहळ्याचे आज खामगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

​वरोडी येथून श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावच्या दिशेने निघालेल्या या पायी दिंडीचे खामगावकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले. ही पायी दिंडी १९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार आहे.

​हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा नाद आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीमुळे खामगाव शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले असून, दर्शनासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

أحدث أقدم