स्व. सौ. मीनाताई जाधव आय.टी.आय.चा उत्कृष्ट निकाल
९९.०७ टक्के गुणांस वैभव गावंडे सर्वोत्कृष्ट; अनेक विद्यार्थ्यांची ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कामगिरी
खामगाव, दि. ११ ऑगस्ट २०२६ : लक्ष्मीनारायण ग्रुपद्वारा संचालित स्व. सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून संस्थेच्या फिटर, इलेक्ट्रिशियन, सर्व्हेअर व कोपा या ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रथम वर्षात पार्थ इंगळे (९५.९३%) याने प्रथम, रोशन तायडे (९४%) याने द्वितीय, तर हर्षल गाडगे (८९.८३%) याने तृतीय क्रमांक मिळविला.अतिक खान ८९.१६ %,कृष्णा वेरुळकर ८९.१६%,गोपाल डकरे ८९.१६%,अनिकेत हिवराळे ८९%,वेदांत काळींगे ८६.०६%,ओम पारस्कर ८६.०५%,तुषार सापधारे ८५.३३%,भाविका अढाऊ ८५.०५% तसेच
सर्व्हेअर ट्रेडच्या प्रथम वर्षात जय पेढरकर (८९.१६%) प्रथम, श्रीनिवास एम. (८८.८३%) द्वितीय, तर हर्षल केंजळे (८७.८७%) तृतीय क्रमांकावर राहिला. कोपा ट्रेडमध्ये यश जाधव (८८.३३%) याने प्रथम, प्रणय विरघट (८५.१६%) याने द्वितीय, तर प्रतीक्षा जोध (८४.०५%) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या द्वितीय वर्षात सोहम शिंदे (९७.१६%) याने प्रथम, साकेत सरदार (९७%) याने द्वितीय, तर ऋषिकेश पवार (९४.३३%) याने तृतीय क्रमांक मिळविला.इफझल मुशीर ९०.६६% ,ज्ञानेश्वर डीगोळे ८८.६६%,हर्षल गायगोळ ८८% विवेक सिरसाट ८७.६६ %
सर्व्हेअर ट्रेडच्या द्वितीय वर्षात वैभव गावंडे याने तब्बल ९९.०७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला. अभिषेक राठोड (९४.३३%) याने द्वितीय क्रमांक मिळविला.संतोष गोडसरे ८६.१६%, विलास पायघन ८६.१६ % यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्ह्यात दर्जेदार कौशल्य शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये स्व. सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्य प्रशिक्षणाची प्रभावी परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, संचालिका सौ. राजकुमारी चौहान व प्राचार्य प्रथमेश डाबेराव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेत कार्यरत निदेशक आकाश खंडेराव, मयूर इंगोले व रेणुका देशमुख यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق