खामगांव येथे श्री संत नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळा उत्साहात साजरा



खामगाव – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक समिती, खामगांव, जि.बुलडाणा यांचे माध्यमातून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 676 वा संजिवन समाधी सोहळा श्री संत नामदेव मंदीर, गोपाळ नगर खामगांव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

दि.9 ऑगष्ट रोजी सकाळी श्रींचा अभिषेक व पुजाअर्चना, हरीनाम, आरती करण्यात आली. दुपारी 2 वाजेपासून श्री वैष्णव शिंपी समाज महिला मंडळाचे वतीने भजन किर्तन व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी महिलांकरीता व लहान मुलांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

          दि.10 ऑगष्ट रोजी सकाळी श्रींची पुजा अर्चना व नंतर हभप श्री मुरलीधरजी वाघ महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. यावेळी कृष्ण व राधाच्या वेशभुषेत आलेल्या बालकांच्या हस्ते दहिहांडी फोडण्यात आली.  त्यानंतर महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले.  नंतर उपस्थित समाजबांधवांनी प्रसादाचा लाभ घेतला.  यावेळी खामगांव शहराच्या नगराध्यक्षा सौ.अपर्णाताई फुंडकर, नगरसेवक राकेश राणा, नगरसेविका सौ.शारदाताई पारखे, सौ. ज्योतीताई भुसारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री संत नामदेव मंदीर येथे भेटून देवुन दर्शनाचा लाभ घेतला.

          दुपारी 4 वाजता श्री संत नामदेव महाराजांच्या पालखीची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्रींच्या पालखीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. शोभायात्रेदरम्यान सहभागी महिलांनी अत्यंत उत्साहाने पावली फुगडी खेळून भजन व किर्तन केले. सायंकाळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समक्ष भारूडचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित लहान बालके, महिला भगिणी व समाजबांधवांनी पावली खेळून आपला आनंद द्विगुणीत केला.   

यावेळी कार्यकारी अभियंता मा.श्री. एकनाथजी तळेले, सहा.अभियंता श्रेणी 1 मा.श्री प्रविणजी पुंडकर यांनी सुध्दा अत्यंत उत्साहाने पावली खेळून आपली उपस्थिती दर्शविली.  तसेच जिल्हा प्रमुख सरसंघचालक मा.श्री बाळासाहेबजी काळे, शहर प्रमुख सरसंघचालक मा.श्री प्रल्हादजी निमकंडे, स्वयंसेवक मा.श्री संजयजी इंगळे,  मा.श्री एकनाथराव फुंडकर, मा.श्री गणेशजी चौकसे, मा.श्री विजयजी महर्षी, मा.श्री संतोषजी वर्मा व इतर मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शवून सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला.

कार्यक्रमासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक समिती, श्री वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ व श्री वैष्णव शिंपी समाज युवक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.  श्री संत नामदेव महाराज यांचा संजिवन समाधी सोहळा श्री वैष्णव शिंपी समाज बांधवांच्या सहकार्याने संपन्न झाला.


Post a Comment

أحدث أقدم