सात वर्षांत ६० हून अधिक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून डॉक्टर नीतीश अग्रवाल व डॉक्टर शारदा अग्रवाल यांनी जपलेली ही सेवावृत्ती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचा आदर्शच म्हणावा लागेल. त्यांच्या या कार्याला समाजातून मनापासून दाद मिळत असून, भविष्यातही त्यांच्या हातून अशीच निरंतर रुग्णसेवा घडत राहो, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.


खामगाव ( नितेश मानकर): आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले जात असताना, रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टरही समाजात आहेत. याचे सुंदर उदाहरण म्हणजे खामगाव येथील अग्रवाल हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नितीश अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सौ. शारदा अग्रवाल. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत अग्रवाल हॉस्पिटलच्या माध्यमातून ६० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांच्या माध्यमातून असंख्य गरजू रुग्णांना तपासणी, मार्गदर्शन आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य आणि गरजू घटकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचा अग्रवाल दांपत्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. नफा कमावण्याच्या उद्देशापेक्षा रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत त्यांनी आपल्या व्यावसायिक क्षेत्रासोबतच समाजाप्रती असलेले कर्तव्यही जपले आहे. विशेष म्हणजे डॉ. शारदा अग्रवाल या सामान्य रुग्णालयातही आपली वैद्यकीय सेवा देत सर्वसामान्य रुग्णांना आधार देत आहेत.

प्रेमळ स्वभाव अन् मृदू संवादातून उपचाराचा विश्वास

रुग्णांसाठी डॉक्टर म्हणजे केवळ उपचार करणारी व्यक्ती नसून त्यांच्या कठीण प्रसंगी आधार देणारी व्यक्ती असते. डॉ. नितीश अग्रवाल आणि डॉ. शारदा अग्रवाल यांच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे, मृदू संवादामुळे आणि रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे त्यांच्या उपचारपद्धतीबद्दल रुग्णांमध्ये विशेष विश्वास निर्माण झाला आहे. रुग्णाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि उपचारादरम्यान मानसिक आधार देणे, ही त्यांच्या सेवाभावाची विशेष ओळख बनली आहे.

वैद्यकीय ज्ञानाला माणुसकीची जोड देत सातत्याने रुग्णसेवा करणाऱ्या अग्रवाल दांपत्याचे कार्य खामगावच्या आरोग्य क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 


Post a Comment

أحدث أقدم