आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी IAP खामगावतर्फे एकदिवसीय विशेष कार्यशाळा

CPR, रुग्णसेवा व आधुनिक वैद्यकीय कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण

खामगाव : आरोग्य क्षेत्रात कार्यरत हेल्थ केअर वर्कर्स, नर्सिंग कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक प्रभावी व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने IAP खामगाव यांच्या वतीने विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे (One Day Workshop) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Hands-on Practice द्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून, दैनंदिन आरोग्यसेवेत उपयोगी पडणाऱ्या महत्त्वपूर्ण कौशल्यांचा सराव करण्याची संधी मिळणार आहे.

ही कार्यशाळा सातपुडा नर्सिंग कॉलेज, वरगट रोड, शेगाव येथे आयोजित करण्यात आली असून, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन केले आहे. सहभागींसाठी नाश्ता व दुपारच्या भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यशाळेत CPR (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन) प्रशिक्षण, रुग्णांची सुरक्षित व प्रभावी काळजी घेण्याच्या पद्धती, आधुनिक वैद्यकीय उपकरणे हाताळण्याचे तंत्र, तसेच दैनंदिन कामकाजातील महत्त्वाच्या वैद्यकीय प्रक्रियांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक सत्रात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार असल्याने सहभागींचा आत्मविश्वास आणि कौशल्ये अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय, या कार्यशाळेचे विशेष आकर्षण असलेले "इन्स्पायर मॉड्यूल" (Inspire Module) सहभागींसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन देणार आहे.आरोग्य क्षेत्रातील सर्व हेल्थ केअर वर्कर्स, नर्सिंग कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post