खामगाव:- कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खामगाव–बोथा–बुलढाणा मार्गावरील शिरजगाव देशमुख परिसरात मोठे बाबळीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. झाड हटविण्याचे काम सुरू होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, संततधार पावसामुळे खामगाव परिसरातील जनजीवनही प्रभावित झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचेही सांगितले आहे.

Post a Comment