वरणगांवकर विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

खामगाव:काल दिनांक 29 जुलै रोजी स्थानिक एस. डी. वरणगांवकर विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृष्णा पेठकर यांनी गीत सादर केले तसेच वर्ग 10 वी च्या प्रणव वारुळकर याने उत्कृष्ट भाषण केले. वर्ग नववीच्या समृद्धी चूनले हिने गुरूंविषयीचे गीत सादर केले.वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्कृष्ट भाषणे व गीते सादर केली.

 कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीचे पूजन करून झाली याप्रसंगी कल्पना जुमळे मॅडम व विनय वरणगांवकर यांनी विद्यार्थ्यांना उदबोधित केले. प्रमुख पाहुण्या म्हणून अनुलोमच्या कार्यकर्त्या सौ. महालक्ष्मी दाते मॅडम या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी नेहमीच आदर ठेवावा असे ते आपल्या भाषणात म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन डामरे सर यांनी केले गुरु पौर्णिमेचा हा कार्यक्रम मुख्याध्यापक गणेश वरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post