जीण गरबा प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन


खामगाव : श्री जीणमाता सेवा समितीच्या वतीने जीण गरबा प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री माहेश्वरी महिला मंडळ, श्री अग्रवाल महिला मंडळ, श्री खंडेलवाल महिला मंडळ, श्री गौड ब्राह्मण महिला मंडळ व श्री जैन समाज महिला मंडळ,  श्री जीणमाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण शिबिर रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ ते शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

शिबिराचे आयोजन केवळ महिला व युवतींसाठी करण्यात आले असून, श्री माहेश्वरी भवन, सराफा, खामगाव येथे गरबा प्रशिक्षण दिले जाणार आहे. नामांकित व अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी महिलांना व युवतींना गरब्याच्या विविध पारंपरिक ताल, स्टेप्स व नृत्यशैलीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
advt.

नामांकित प्रशिक्षक :- श्री आनंद शर्मा, श्री सुजित दायमा, श्री मयूर सोनोने, श्री करण शाहा , सौ. जिगीशा पटेल, सौ. दीपा जोशी, सौ. शीतल चावंडे, सौ. भूमिका सांगाणी, सौ. राखी तिवारी, सौ. खुशबू चावंडे, सौ. दीपिका राठी, सौ. भावना खंडेलवाल, सौ. सोनल बुद्धदेव, सौ. निष्ठा जेठानी पुरवार, सौ. रेखा ठाकुर, कु. वैष्णवी राजपूत, कु. गौरी ठाकुर, कु. दिव्या बरलिया, कु. स्विटी शर्मा, कु. सोनाली तिवारी व कु. साक्षी उन्हाळे हे प्रशिक्षण देणार आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक गरबा संस्कृतीचा प्रसार व्हावा तसेच महिला व युवतींना शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात गरबा शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

खामगाव शहरातील महिला व युवतींनी या प्रशिक्षण शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जीणमाता सेवा समिती व आयोजक महिला मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
गोविंद चूड़ीवाले – ९४२२११८६७८


Post a Comment

Previous Post Next Post