खामगाव श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त.. सोशल मीडियावर राहणार लक्ष.. अफवांवर विश्वास ठेवू नका - जि. पो. अधीक्षक निलेश तांबे
![]() |
| खामगाव शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १ अपर पोलीस अधीक्षक, १ डीवायएसपी, ५ पोलीस निरीक्षक, २२ API/PSI, RCP, SRPFसह शेकडो पोलीस-होमगार्ड तैनात |
खामगाव : श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी खामगाव शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर आज रूट मार्च काढून नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १ अपर पोलीस अधीक्षक, १ डीवायएसपी, ५ पोलीस निरीक्षक, २२ API/PSI यांच्यासह RCP, SRPF आणि पोलीस-होमगार्ड मिळून एकूण ३५५ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे समजते. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, मिरवणुकीच्या मार्गावरही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास हातभार लावावा.
![]() |
| Advt. |



Post a Comment