जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज आवार येथे गणरायाला निरोप
दिनांक 24 सप्टेंबर रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेज आवार येथील गणरायासाठी महाप्रसादाचे आयोजन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेद्वारा करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष प्रा रामकृष्ण गुंजकर तसेच जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरचे प्राचार्य रवींद्र जी मांडवेकर सर संस्थेचे सदस्य आदित्य गुंजकर यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन मनोभावे करण्यात आले श्री गणरायाची आरती करून प्रा गुंजकर सरांनी सर्व विद्यार्थ्यांना श्री चे आराधना आपण कशासाठी करतो याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांना गणपती ही विद्येची देवता असून आम्हा विद्यार्थ्यांना अफाट अभ्यास करण्याची एकाग्रतेची कुशलतेची शक्ती देवो ही आराधना करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होवो आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे आम्हाला बळ मिळो ही संकल्पना सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितली सरते शेवटी सर्व शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शाळेचा सर्व परिसर भक्तीमय झाला होता विशेष करून डीजे या वाद्याला टाळून भारतीय पारंपरिक वाद्य वाजवून श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे.


Post a Comment