गणेश विसर्जनदरम्यान ओमसाई फाउंडेशनने बजावली जीव रक्षकाची भूमिका!
नांदुरा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ओमसाई फाउंडेशनच्या जीवनरक्षक टीमने विशेष खबरदारी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना नदीपात्रातील धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करत स्वयंसेवकांनी सतर्कतेने सुरक्षा व्यवस्था सांभाळली.
विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ओमसाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नदीकाठावर उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी जीवनरक्षक साहित्य व आवश्यक साधनांसह टीम सज्ज ठेवण्यात आली होती.
ओमसाई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे गणेशभक्तांना सुरक्षित वातावरणात विसर्जन करता आले. भाविकांची सुरक्षा हीच प्राथमिकता या उद्देशाने फाउंडेशनच्या जीवनरक्षक टीमने केलेल्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
ओमसाई फाउंडेशन नांदुरा – जीवनरक्षक टीम यांच्या या विलास निबोळकर नितीन ठाकरे गजानन भुसारी विष्णू धांडे आनंद वावगे नारायण निबाळकर वैभव राहणे कमलेश बोके राहुल निमकर्डे राजु खंडारे सुभाष पिवळतकर श्रीराम निबाळकर शाम जुबळे प्रविण प्रारखेडे कपिल पाटील व आपत्ती व्यवस्थापन चे संभाजी पवार राजपूत साहेब अंकुश बोबडे पोलीस कर्मचारी संदुके सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

إرسال تعليق