खामगाव : सेवाभावी उपक्रमांनी मुकुल वासनिक यांचा वाढदिवस साजरा
खामगाव : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहर काँग्रेस कमिटी तसेच खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसजनांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खामगाव सामान्य रुग्णालयातील रुग्णांना अन्नदान करण्यात आले. तसेच खामगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या उपक्रमांना खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेसजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्यात आला.



إرسال تعليق