खामगावात शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर धडकला; विविध मागण्यांचे निवेदन
खामगाव-खरीप पिकांचे नुकसान, पीक विम्याचा प्रश्न, अपुरा वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी खामगावात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार नितीनबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. एक रुपयांच्या पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने बिमा भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतीसाठी पूर्ण क्षमतेने व सुरळीत वीजपुरवठा करावा, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी आणि बीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफीच्या उर्वरित याद्या जाहीर कराव्यात, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे, विद्याध्यर्थ्यांची फी माफ कराबी, पशुधनासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच 'पीएम किसान' सन्मान निधीची रक्कम वाढविण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश होता. मोर्चाला बुलढाणा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, उपनेते जालींदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात, सौ. जयश्रीताई शेळके, गजानन बिलेवार, सौ. चंदाताई बडे, उर्मिलाताई ठाकरे, गजानन धांडे, गजाननराव वाघ, वसंतराव भोजने, शुभम पाटील, भिकुलाल जैन, दत्तात्रय पाटील, विजय बोदडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment