खामगावात ‘पोषण आहार समुपदेशन’ कार्यक्रम उत्साहात
महिलांची मोठी उपस्थिती; संतुलित आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगावच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर होत्या. प्रमुख वक्त्या डॉ. प्राजक्ता पसारकर दुडे यांनी महिलांना दैनंदिन जीवनातील संतुलित आहार, महिला व बालकांचे आरोग्य तसेच शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
![]() |
| जाहिरात |
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योती श्रीकांत भुसारी आणि उपसभापती फातेमाबी मो. नईम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगर परिषद खामगावच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन राजेश झनके यांनी केले.


Post a Comment