मॉडीफाय बुलेट सायलेन्सरविरोधात खामगाव शहर पोलिसांची कारवाई; २९ हजारांचा दंड

खामगाव : शहरातील वाहतूक नियमन तसेच मॉडीफाय बुलेट सायलेन्सरमुळे होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी खामगाव शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या दोन वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग, खामगाव यांच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

या कारवाईत MP-07 NH-9521 या वाहनावर ८ हजार रुपये, तर MH-28 AC-9900 या वाहनावर २१ हजार रुपये, असा एकूण २९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मॉडीफाय बुलेट सायलेन्सरमुळे निर्माण होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी बुलेट मोटारसायकलमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत आणि कंपनीकडून वाहनासोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायलेन्सरचाच वापर करावा, असे आवाहन खामगाव शहर पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या आदेशाने करण्यात आली. कारवाईत डी.वाय.आरटीओ शेळके, पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोळंके आणि पोलीस कॉन्स्टेबल रमेश काकड सहभागी झाले.

Post a Comment

أحدث أقدم