जीण गरबा प्रशिक्षण शिबिराचा भव्य शुभारंभ



खामगाव : श्री जीण माता सेवा समिती तसेच विविध महिला मंडळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीण गरबा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री माहेश्वरी भवन, सराफा, खामगाव येथे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात झाला.


प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून खामगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. अपर्णा सागरजी फुंडकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शिबिराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व प्रशिक्षकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास निलेश भैया, डॉ. विजय टावरी, आनंद चितलांगे, दिनेश अग्रवाल, जगदीश अग्रवाल, पंकज गौड, दिनेश सुरेखा, ललित गोदानी, हेमंत बागडी, पीयूष अग्रवाल, अॅड. अंकित अग्रवाल, आदित्य डीडवानिया व अनुज चूडीवाले यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

महिला मंडळांच्या वतीने रत्ना देवी खंडेलवाल, शकुंतला चूडीवाले, जिगीश पटेल, कविता भूत, ममता केडिया, सुप्रिया खंडेलवाल, ममता पनपालिया, सरिता अग्रवाल व मंजू बोहरा यांची उपस्थिती होती.तसेच निखडे मॅडम, सरिता मोदी, कविता टावरी, शांता देवी शर्मा, संगीता सोनी, हर्षा नागडा, दक्षा गौड व छाया वास्तनी यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.आयोजकांनी सांगितले की, हे १४ दिवसीय जीण गरबा प्रशिक्षण शिबिर महिला व युवतींना गरबा नृत्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षकांकडून पारंपरिक गरब्याच्या विविध शैली, ताल तसेच नृत्याच्या बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर व आयोजक मंडळाने शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अधिकाधिक महिला व युवतींनी या सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.श्री जीण माता सेवा समिती व सर्व आयोजक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक, महिला व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم