खामगांव अर्बन बँकेच्या वतीने गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भाविकांना चहाचे वितरण तसेच विविध कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा

खामगांव अर्बन बँक व कर्मचारी दत्त उपासक गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव मोठ्‌या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यावर्षी सुध्दा गणेश चतुर्थी च्या शुभदिनी लोकमान्यांच्या पुतळ्‌यास पुष्पहार अर्पण करून ढोल-ताशांच्या गजरात गुलाब व झेंडूचे पुष्पांची उधळण करीत मुख्य कार्यालयाचे परिसरात पर्यावरणपूरक गणरायांची स्थापना करण्यात आली होती. उत्सवादरम्यान विविध सांस्कृतीक, कौटुंबिक व सामाजीक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गणेशोत्सवादरम्यान दररोज संध्याकाळी गणरायाचे आरतीला विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यामध्ये (१) श्री. पियुषजी जगताप सर अप्पर पोलीस अधिक्षक, (२) श्री. सुबोधकुमारजी मुख्य व्यवस्थापक, भारतीय स्टेट बैंक (३) श्री. प्रदीपजी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, (४) श्री. बाळासाहेब काळे, जिल्हा संघचालक, (५) श्री. प्रविणजी पुंडकर मुख्य कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, (६) श्री. तळेले साहेब उपकार्यकारी अभियंता सा.बां. विभाग (७) श्री. अनिरुध्दजी कविमंडन स्टॅच्युटरी ऑडीटर (८) श्री. अॅड. प्रदीपजी पाटील, अधिवक्ता उच्च न्यायालय, (९) श्री. मामासाहेब देशमुख उद्योजक (१०) श्री. संतोषजी मनसुटे प्रवचनकार तथा व्याख्याते इ. उपस्थित होते. यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा पाहता मंडळाने अनावश्यक खर्चात कपात करून वर्गणीतील शिल्लक राहणाऱ्या रक्कमेतून सामाजीक उपक्रम घेण्याचे ठरविले आहे.


तसेच अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर खामगांव शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सर्व गणेश भक्तांकरीता मोफत चहाचे वितरण स्थानीक अर्जुन जल मंदीर, सरकी लाईन खामगांव येथे संपन्न झाले. सर्व प्रथम शहरातील मानाचे श्री लाकडी गणपतीस बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. श्री. विजयजी पुंडे, उपाध्यक्ष डॉ. श्री. सतिशजी कुळकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभाकरजी पाटील यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले व चहा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनतर चौकात येणाऱ्या सर्व मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचा भगवा दुप‌ट्टा व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यन्त २५००० चे वर भाविकांना चहा वितरीत करण्यात आला. बँकेच्या चहा स्टॉलला कामगार मंत्री नामदार अॅड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देवून या सामाजीक उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ. मनिषा माटे, मुख्य व्यवस्थापक विवेक कुळकर्णी, संतोष जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश तराळे, प्रफुल खराटे, अॅड. श्रीकांत निखाडे, अजय माटे, शाखा व्यवस्थापक नरेन्द्र देशपांडे, गजानन धनोकार, नितीन महिन्द्रकर, गिरीश देशपांडे, देविदास उमाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन राजु जुनारे यांनी केले. यशस्वीतेकरीता खामगांव अर्बन बँक व कर्मचारी दत्त उपासक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم