लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीतर्फे ईको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन
खामगांव : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती, श्री अ.खी. नॅशनल हायस्कूल, खामगांव आणि वर्ल्ड फॉर नेचर, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “संस्कृतीचा श्री गणेश – वर्ष ७ वे” या उपक्रमांतर्गत शाळूमातीपासून ईको-फ्रेंडली श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत श्री अ.खी. नॅशनल हायस्कूल, खामगांव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ५ ते ६५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी होऊ शकतात. प्रवेश शुल्क ₹५० असून प्रथम १५० प्रवेशिकांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रवेश शुल्क शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी लागणारी शाळूमाती आयोजकांकडून स्पर्धास्थळी उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ट व आकर्षक ११ गणेशमूर्तींना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून कलाध्यापक संजय गुरव मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख लॉ.प्रसाद टिकार, व लॉ.सुगना टिकार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर, लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे अध्यक्ष पीएमजेएफ लॉ.नरेश चोपडा, सचिव लॉ.दिव्या अग्रवाल, आणि कोषाध्यक्ष लॉ.डिंपल शाह यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर 9021221021, कलाध्यापक संजय गुरव 9850664020, अध्यक्ष पीएमजेएफ लॉ. नरेश चोपडा 9422181963, सचिव लॉ. दिव्या अग्रवाल 9822337041, कोषाध्यक्ष लॉ. डिंपल शाह 9422115969 यांच्याशी संपर्क साधावा. वरील माहिती पीआरओ एमजेएफ लॉ.राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


Post a Comment