मराठा देशमुख समाज मंडळातर्फे सोमवारी कोजागिरीचे आयोजन
खामगाव : मराठा देशमुख समाज उन्नती मंडळातर्फे सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक देशमुख समाज मंगल कार्यालय, सिव्हिल लाईन, खामगाव येथे कोजागिरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कोजागिरी उत्सवात समाजातील सर्व समाजबांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा देशमुख समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ तसेच युवक मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून कोजागिरी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा देशमुख समाज उन्नती ,स्वराज मराठा देशमुख प्रतिष्ठान, देशमुख समाज महिला मंडळ,देशमुख समाज युवक मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment