खामगावात प्रा. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ शिक्षक संवाद मेळावा संपन्न

खामगाव : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेल्या प्रा. सौ. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

या संवाद मेळाव्याला उर्दू शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षकांशी संवाद साधणे आणि उमेदवाराच्या प्रचाराला गती देणे, या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले.



Post a Comment

Previous Post Next Post