आई राधा उदो उदो......

 खामगाव व परिसरात ११७ मंडळांकडून 'आई जगदंबेची होणार स्थापना'

*खामगाव :* स्थानिक जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळांच्या वतीने जगदंबा उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात कोजागिरी पौर्णिमेपासून साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही हा उत्सव शहरात साजरा होत असून शहर व ग्रामीण भागात तब्बल ११७ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळांकडून रविवार २५ ऑक्टोबर रोजी आई जगदंबेची स्थापना करण्यात येणार आहे.

जगदंबा उत्सवाची तयारी विविध मंडळांनी केली आहे. या उत्सवासाठी आकर्षक विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात येते. तसेच अनेक मंडळांकडून महाप्रसादाचे वितरणही करण्यात येते. २ नोव्हेंबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहते.

जगदंबा उत्सव साजरा करण्याची परंपरा खामगाव शहरात जोपासलेली आहे. शिवाजी नगर पोस्टेंतर्गत शहरात ५३ व ग्रामीणमध्ये २१ तसेच शहर पोस्टेंतर्गत शहरात ३८ व ग्रामीणमध्ये ५ अशा एकूण ११७ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळांकडून जगदंबेची स्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

ऍड.

Post a Comment

Previous Post Next Post