खामगाव: १५ गोवंशावर उपचार; १२ गोवंशाला जीवदान : एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
खामगाव : शहरात गौसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या वतीने मानवतेचा आदर्श निर्माण करणारे गौसेवा कार्य राबविण्यात आले. दि. १२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांत अपघातात गंभीर जखमी झालेल्या, विषबाधा झालेल्या तसेच आजारी पडलेल्या बेवारस १५ गोवंशांवर फाउंडेशनच्या गौसेवकांनी उपचार केले. यामध्ये १२ गोवंशांना उपचारानंतर जीवदान मिळाले, तर दुर्दैवाने ३ गोवंशांचा मृत्यू झाला. मृत गोवंशांना फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मेनरोड फरशी, भगतसिंग चौक, सनी पॅलेस, शिवाजी वेस, आईसाहेब मंगल कार्यालय, बस स्टँड, गोकुल नगर, सावजी लेआऊट, महाकाल चौक, गजानन नगरी, पंढरी बाबा नगर, तलाव रोड, शामल नगर, बारादरी, मस्तान चौक, भुसावळ चौक आदी शहरातील विविध भागांत हे सेवा कार्य राबविण्यात आले. जखमी व आजारी गोवंशांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी गौसेवकांनी घटनास्थळी धाव घेत उपचाराची व्यवस्था केली.
या गौसेवा कार्यात गौसेवक सुरजभैय्या यादव, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. राज देशमुख, डॉ. रंजीत राठोड, डॉ. शुभम जरांगे, पवन घडेकर, डॉ. ऋषीकेश बोरे, गजानन माकोडे, किसन गांधी, मोहन शर्मा, गौरव कवटेकर, सुरज निंबाळकर, अतुल निमकर्डे, सागर जाधव, प्रवीण ठाकरे, शिवा मंडोकार, दर्शन पवार, अभिषेक गावंडे, यश टिकार, गोलू शर्मा, राहुल ठाकुर, अविनाश इंगळे, दुर्गेश सारसर, संजय थोरात, प्रदीप शमी, चेतन कदम व योगेश राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.
अशी माहिती एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे पंकज अंबारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.


إرسال تعليق