गो. से. महाविद्यालयात येथे नवीन मतदार नोंदणी अभियान
खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील उर्दू विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय शंकररावजी बोबडे सभागृहामध्ये सकाळी ११.३० वाजता नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वराडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सोनाली भाजीभाकरे, नायब तहसीलदार, खामगाव उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. डी. टी. आढाऊ, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रा. डॉ. व्ही. यू. मोरे, क्षेत्रीय समन्वयक, रा.से.यो. यांची मंचावर उपस्थिती होती.
![]() |
| Advt. |
कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. पात्र विद्यार्थ्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर प्रा. डॉ. व्ही. यू. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी अभियानाचा उद्देश व त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याने मतदार म्हणून नोंदणी करून आपल्या मतदानाच्या अधिकाराचा जबाबदारीने वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. सोनाली भाजीभाकरे, नायब तहसीलदार, खामगाव यांनी विद्यार्थ्यांना नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे तसेच ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शासकीय संधींची माहिती घेऊन योग्य नियोजन व सातत्याने अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वराडे यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी करून आपल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य व जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नवीन मतदार नोंदणी तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. टी. आढाऊ यांनी केले. उर्दू विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामुळे पात्र विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती मिळून लोकशाहीतील त्यांच्या सहभागाबाबत जनजागृती झाली.


إرسال تعليق