श्रीकृष्ण नवरात्रोत्सव मंडळात चिमुकल्या बालिकांनी साकारला आदिशक्तीचा अवतार; भक्तिभावाने केली माता राणीची आरती
खामगाव येथील आदिशक्ती नगर, रेखा प्लॉट परिसरात श्रीकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक व भक्तिमय वातावरणात माता राणीची आरती करण्यात आली. यावेळी परिसरातील चिमुकल्या बालिकांनी देवी मातेची वेशभूषा परिधान करून मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने माता राणीची आरती केली.
या बालिकांच्या सुंदर वेशभूषेने आणि भक्तिमय आरतीने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. देवीच्या रूपातील या चिमुकल्या बालिकांमुळे संपूर्ण मंडपात उत्साह, आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
श्रीकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपण्यासोबतच लहान मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी प्रेम निर्माण करण्याचा सुंदर उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील भाविक उपस्थित होते.

Post a Comment