केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीचे राज्यपालांना निवेदन
खामगाव : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर (SIR) व निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांमध्ये मनमानी केल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी, खामगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवरून देशभरात नाराजी व्यक्त होत असून, विरोधी पक्षांसह युवकांकडून आंदोलन केले जात आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार निष्पक्षपणे काम करावे. तसेच संविधानाच्या तरतुदींनुसार सर्व नागरिकांना आणि राजकीय पक्षांना समान न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, खामगाव विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर दादा पाटील, तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शहर कार्याध्यक्ष किशोर भोसले, काँग्रेस नेते धनंजय देशमुख, म.प्र. उपाध्यक्ष (एस.सी. विभाग) गौतम गवई, म.प्र. उपाध्यक्ष (ओबीसी विभाग) कैलास फाटे, म.प्र. उपाध्यक्ष (किसान काँग्रेस) मंगेश भारसाकळे, म.प्र. उपाध्यक्ष (अल्पसंख्याक काँग्रेस) मो. वसीम भाई, काँग्रेस नेते अतुल सिरसाट, संजय तायडे, चैतन्य पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बबलू पठाण, कुबासाचे संचालक प्रमोद चिचोळकर आणि खरेदी-विक्री संस्थेचे संचालक पांडुरंग राखोंडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment