पहुरजिरा येथे काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सर्वांना सोबत घेत काँग्रेस पक्षाला पुढे घेवून जाण्याचे काम करू - ज्ञानेश्वरदादा पाटील
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क: सद्याचा काळ काँग्रेस पक्षासाठी संघर्षाचा असला तरी संघर्षातून उभारी घेण्याची ताकद काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. शाहू, फुले, आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आजाद या महामानवांच्या चिचारांवर काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून सर्वांना सोबत घेत काँग्रेस पक्षाला पुढे घेवून जाण्याचे काम करू, असे खामगाव विधानसभा मतदार संघाचे समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील म्हणाले.
तालुक्यातील पहुरजिरा येथे काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ ता.१७ जून रोजी उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खामगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, खामगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे यांच्यासह काँग्रेसचे जेष्ठ नेते जुलकर सेठ, खामगाव शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल सिरसाट, किसान काँग्रेस विदर्भ अध्यक्ष मंगेश भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पहुरजिरा ग्रामस्थांच्या वतीने काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या आगामी काळातील वाटचाल व ध्येय धोरणाविषयी मनोगत व्यक्त करून आभार मानले. दरम्यान काँग्रेस पक्षांचे युवा कार्यकर्ते गुड्डू पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पारस्कार, किसना पारस्कार, तुळशीराम बुंदे, गुड्डू पठाण, जावेद ठेकेदार, शेख अनिस सय्यद असिफ, अशफाख शाह, गणेश सडतकार, अमीर शेख यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------

Post a Comment