पुन्हा अतिक्रमण करू नका, अन्यथा साहित्य जप्त होईल
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच राहणार; न. प. प्रशासनाची माहिती
खामगाव - नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच राहणार असून कुणीही शासकीय जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा साहित्य जप्त करण्यात येईल असा इशारा न. प. प्रशासनाने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिला आहे.
नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबलेली नसून सुरूच राहणार आहे.त्यामुळे कुणाही पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान ज्यांची दुकाने काढण्यात आली त्यांनी त्वरित आपले साहित्य घेऊन जावे अन्यथा सदर साहित्य जप्त केले जाईल. दरम्यान ज्या भागातील अतिक्रमण काढणे बाकी आहे, त्या भागातही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे ज्या व्यवसायिकांचे किंवा नागरिकांचे रस्त्यावर/ सार्वजनिक जागेवर अतिक्रमण असेल त्यांनी त्वरित स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन नगर पालिका अतिक्रमण विभाग प्रमुख मोहन अहिर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment