शंगरी-ला जीएटी आरसी जेडसी स्कूलिंग व विंग ऑफ होप डिस्ट्रीक्ट कॅबीनेट इंस्टालेशन संपन्न
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :-. १६ आणि १७ ऑगष्ट रोजी द ग्रँड जलसा, अकोला येथे आरसी आणि झेडसी आणि जीएटी आणि पहिली पीडीजी सल्लागार बैठक आणि डिस्ट्रीक्ट इंस्टालेशन समारंभ आयोजित केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि स्थापना अधिकारी पीआयडी लॉ. सुनिलकुमार आर सर होते. त्यांच्यासोबत पीआयडी लॉ. डॉ. नवल जे. मालू सर, जीएटी एरिया लिडर लॉ. विनोद वर्मा सर, एलसीआयएफ एरिया लिडर लॉ.टि.व्ही. श्रवणकुमार सर, सन्माननीय पाहुणे एमसीएस लॉ. गिरीशजी सिसोदीया आणि एफव्हीडीजी लॉ. विलासजी साखरे होते. या कार्यक्रमाला माजी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर आणि आशिर्वाद देणारे अतिथी श्री गोपीकिशनजी बाजोरीया देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक लॉ. यश बाजोरीया यांनी केले होते.
या कार्यक्रमात कलाकार जासु खान आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते कामरान मुजावर यांचे सांस्कृतीक सादरीकरण आणि प्रेरक सत्रे झाली. शपथविधी सोहळ्याबद्दल एफव्हीडीजी लॉ. दत्तात्रेय औसेकरजी, एसव्हीडीजी लॉ. योगेशकुमार जयस्वालजी आणि डिसीएस लॉ. डॉ. प्रदीपजी गर्गे, डीसीटी लॉ. डॉ. केलाशजी मुरारका आणि सर्व कॅबिनेट अधिकारी, आरसी झेडसी आणि लिओ जिल्हा अध्यक्ष साक्षी जैन यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पीएमजेएफ लॉ. अश्वीनकुमार के. बाजोरीया, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर ३२३४-एच२, एमजेएफ लॉ. वैशाली बाजोरीया यांनी कार्यक्रमास शुभेच्छा प्रदान केल्या. वरील बातमी डिस्ट्रीक्ट पीआरओ एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment