बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटी व लॉयन्स क्लब खामगांव यांच्या वतीने मधुमेह मार्गदर्शन व नेत्र तपासणी शिबिर

जनोपचार नेटवर्क खामगाव : बुलढाणा नेत्र सर्जन सोसायटी व लायन्स क्लब खामगाव मेन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी जागतिक डायबिटीस दिनानिमित्त चर्चासत्राचा तसेच मधुमेहामुळे येणारे आंधळेपणा यांची तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी लॉयन्स आय हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे तरी लोकांनी उपस्थित राहून या डायबेटिस मार्गदर्शनात व चर्चासत्राचा लाभ घ्यावा ही विनंती असे आवाहन बुलढाणा ऑफाथोल मिक सर्जन सोसायटी व लॉयन्स क्लब खामगाव तसेच लॉयन्स क्लब चे प्रसिध्दी प्रमुख लॉ.डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post