सरकारी कामात अडथळा केल्याचे आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता
पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे गुन्हा क्र. 101/2013 दि. 22/12/2013 रोजी नुसार फिर्याद दिली होती की फिर्यादी हा बुलढाणा कारंजा बसवर कंडक्टर म्हणुन कर्तव्यावर हजर असतांना बस खामगाव बस स्थानकावर आली असता आरोपी महादेव रामदास तायडे याने फिर्यादीला बस कुठे जात आहे या कारणावरुन कॉलर पकडुन शिवीगाळ केली, गालावर चापट मारली, लोटपाट करुन धमकी दिली अशा फिर्यादीवरुन पोलीसांनी आरोपींविरुध्द कलम 353, 332, 186 504 भादवि नुसार गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय क. 2 खामगाव दाखल केले होते. सदर न्यायालयात आरोपींविरुध्द सदरचा खटला चालवुन साक्षीदार तपासण्यात आले व दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकुन मा. न्यायालयाने आरोपींचे वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन दि. 14/01/2026 रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींकरीता अॅड. श्रीराम गावंडे (निमगावकर) यांनी न्यायालयात काम पाहीले.

إرسال تعليق