लॉयन्स एक्स्पो २०२६ च्या कार्यालयाचे उ‌द्घाटन व माहितीपत्रकाचे विमोचन

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - स्थानिक सामाजिक सेवाभावी संस्था लॉयन्स क्लब खामगांव व्दारा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लॉयन्स एक्स्पो २०२६ भव्य व्यापार, कृषि, व्यंजन व मनोरंजन प्रदर्शनी चे आयोजन दि. १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदान, जलंब रोड, खामगांव येथे केले आहे. लॉयन्स क्लब खामगांव अंतर्गत लॉयन्स क्लब सव्हींस ट्रस्ट व्दारा संचालित नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल मधील नेत्र रुग्णांना उत्तमोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी या लॉयन्स एक्स्पोचे माध्यमातून संकलीत निधीचा उपयोग करण्यात येतो. मागील १३ वर्षापासून निरंतरपणे खामगांवकर व बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

लॉयन्स एक्स्पो मध्ये व्यापाऱ्यांसाठी कमर्शियल झोन, खवय्यांसाठी चविष्ट फुड झोन व बालगोपालांच्या मनोरंजनासाठी अॅम्युझमेंट झोन तसेच युवा व युवतींसाठी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी गुरुवार दि. १२ फेब्रुवारी ते मंगळवार दि. १७ फेब्रुवारी पर्यंत दररोज विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.


दि. १३ जानेवारी २०२६ रोजी लॉ. मेल्वीन जोन्स जयंतीचे दिवशी लॉयन्स एक्स्पो २०२६ चे माहितीपत्रक (एक्स्यो ब्रोशर) चे विधिवत विमोचन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच लॉयन्स एक्स्पो २०२६ च्या कार्यालयाचे उद्घाटन लॉ. हर्षा कमाणी, लॉ. नम्रता लाठे, लॉ. दिपिका परदेशी, लॉ.डॉ. उज्वला पवार, लॉ. आशा तळवणकर, लॉ. शितल देशमुख, लॉ. नेहा कमाणी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर, एक्स्पो चेअरपर्सन लॉ. निखिल लाठे, एक्स्पो सचिव लॉ. डॉ. धनंजय तळवणकर, एक्स्पो कन्व्हेनर लॉ. शंकर परदेशी, एक्स्पो कोषाध्यक्ष लॉ. राजेंद्र झांबड, क्लब अध्यक्ष लॉ. तुषार कमाणी, सचिव लॉ. डॉ. गिरिश पवार, कोषाध्यक्ष लॉ. कुणाल भिसे, लिओ अध्यक्ष लिओ पराग खराटे, व लॉयन्स तथा लिओ सदस्य उपस्थित होते.

नांदुरा रोड स्थित, जिएसटी ऑफीस समोरील नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल मध्ये सदर लॉयन्स एक्स्पो चे कार्यालय सकाळी ११ ते २ व सायं. ८ ते १० या वेळेत कार्यरत असणार आहे. लॉयन्स एक्स्पो २०२६ मध्ये ज्या व्यवसायीकांना आपल्या उत्पादनाची जाहीरात, प्रदर्शन व विक्री करावयाचे आहे त्यांनी ऑफीसमध्ये संपर्क साधावा असे आवाहन लॉयन्स एक्स्पो २०२६ चे चेअरपर्सन लॉ. निखिल लाठे (मो. ८८३०६०७१९९), सचिव लॉ. डॉ. धनंजय तळवणकर (मो. ९८२३४५०७१७), कोषाध्यक्ष लॉ. राजेंद्र झांबड (मो. ९८५०३०४८५८), क्लब अध्यक्ष लॉ. तुषार कमाणी (मो. ९८२२४६३३४६), क्लब सचिव लॉ. डॉ. गिरिश पवार (मो. ९४२३७६०५७१) यांनी केले आहे. असे लॉयन्स क्लब खामगांवचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण व लॉ. विजय मोरखडे व लॉ. श्रमिक जैसवाल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم