स्वर्गिय बापूसाहेब खराटे स्मृती सेवारत्न पुरस्कार, मातृछाया ट्रस्ट, गोवा ला प्रदान !

मुंबई च्या एसएनडीटी वुमन्स यूनिवर्सिटी या संस्थांमध्ये सुरू असलेल्या नेशनल कॉन्फरन्स ऑन इंडियन सिनेरियो ऑफ अल्टरनेटिव केर फॉर द चिल्ड्रन्स या दोन दिवसीय (२०-२१ फेबुवारीः) राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि विशेषतः अनाथ गरीब व पालकत्व हरेवलेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात भरीव योगदान देण्यासाठी, स्वनाथ फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने बापूसाहेब ( रमेशराव) खराटे, सेवारत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास, तसेच ऊर्जा राज्यमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते, गोवा राज्यातील मातृछाया ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेला प्रधान करण्यात आला, या पुरस्कारपुरस्कार सोहळ्यात एसएनडीटी विश्वविद्यालयाच्या कुलपती डॉ उज्वला चक्रदेव, छत्तीसगड राज्याच्या राज्यमंत्री दर्जा असलेल्या बाल संरक्षण कमिशन च्या चेअरमपर्सन डॉ वर्णिका शर्मा, आणि स्वनाथ फाउंडेशन च्या प्रमुख डॉ श्रेया श्रीकांत भारतीय, तसेस खराटे परिवार, खामगाव तर्फे श्री अतुल खराटे, सौ सुचेता खराटे उपस्थित होत्या.


या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मातृछाया ट्रस्ट, गोवा या स्वयंसेवी संस्थेला संपूर्ण गोवा राज्यामध्ये अनाथ मुलांसाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, या बद्दल देशातील विविध राज्यातील आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरस्काराचे आयोजक, खामगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँक चे वरिष्ठ अधिकारी श्री प्रफुल खराटे आणि परिवार यांचे विशेष कौतुक आणि आभार मानले. मातृछाया, गोवा संस्थेतर्फे डॉ


सुभाष भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Post a Comment

أحدث أقدم