बुलढाणा जिल्ह्यातील अतुल खराटे यांना एनर्जी मैनेजमेंट या विषयामध्ये, मुंबई येथे पीएचडी प्रदान
मुंबईचे अतुल खराटे यांना, एनर्जी मैनेजमेंट , विशेषतः देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील ऑइल आणि गैस , तसेच, सिटी गैस डिस्ट्रीब्यूशन ची सध्यस्तिथी आणि भविष्यातील उपक्रम तसेच महाराष्ट्राला नवीन आणि हरितऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि पॉलिसीज या विषयांमध्ये संशोधन केल्याबद्दल डी वाय पाटील यूनिवर्सिटी , नवी मुंबई यांच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली.
इंडियन ऑइल अदाणी वेंचर्स लिमिटेड चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असलेले अतुल खराटे, हे मूळचे विदर्भातील खामगाव चे असून सध्या मुंबई मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदाधिकारी आहेत, तसेच
विविध राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान, सामाजिक आणि मैनेजमेंट एजुकेशन संस्था, बीजेपी उद्योग आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावरील सीआयआय, एफआयसीसीआय , इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी , कार्बन कैप्चर , अश्या अनेक संस्थाचे राष्ट्रीय प्रतिनिधी आहेत.
डॉ अतुल यांच्या यशाबद्दल राज्याचे कैबिनेट मंत्री श्री आकाश फुंडकर , आमदार श्री चैनसुख संचेती , माजी आमदार राजेश एकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिला संघचालक श्री बाळासाहेब काळे, नगर संघचालक श्री दामोदर लखानी, श्री संतोष देशमुख , सागरदादा फुंडकर, बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी अभिनंदन केले आहे. अतुल खराटे यांचे शिक्षण मलकापूर येथे चांडक विद्यालय येथे झाले आणि खामगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँक चे अधिकारी श्री प्रफुल खराटे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.
डॉ अतुल खराटे यांचा यशाबद्दल केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, सीएमओ महाराष्ट्र , माजी खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे , आमदार श्री श्रीकांत भारतीय , उद्योजक श्री अरुण लखानी, टीजेएसबी अध्यक्ष श्री शरद गांगील, नागपुरातील श्रीराम अर्बन चे अध्यक्ष श्री पराग सराफ , लोकसत्ता चे संपादक श्री गिरीश कुबेर , सारस्वत बँक अध्यक्ष श्री गौतम ठाकूर , आयआयएम मुंबई चे डायरेक्टर मनोज कुमार तिवारी आणि आयआयएम नागपूर चे डायरेक्टर भीमराव मैत्री, आयआयएम शिलाँग चे श्री अतुल कुलकर्णी, बिल्ड इंडिया चे अध्यक्ष श्री वैभव डांगे , इंडियन फेडरेशनल ऑफ ग्रीन एनर्जीज चे श्री संजय गंजो, तसेच पद्मश्री डॉ गणपती यादव आणि पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.


إرسال تعليق