जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिलांचे आत्मचरित्र पुस्तक वाटप 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- जागतिक महिला दिनानिमित्त खामगाव येथे कार्यरत महिला पोलीस भगिनींना थोर महिलांचे चरित्र पुस्तक वाटप करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मिशन परिवर्तन अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी व अंमलदार तसेच गृहरक्षक दलातील महिला यांना मा जिजाऊ, सिंधुताई सपकाळ, श्यामची आई या थोर महिलांचे आत्मचरित्र पुस्तक वाटप करून साजरा करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم