उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथे अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके; कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


खामगाव : अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने खामगाव नगर परिषद अग्निशमन विभागाच्या तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या वतीने परिचारिकासाठी निरंतर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथे आग प्रतिबंधक उपाययोजना व बचाव कार्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारच्या आगी कशा विझवायच्या, अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करायचा तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष अग्निशमन यंत्र हाताळून आग विझवण्याचा सराव केला. या उपक्रमामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वाढली असून अशा प्रात्यक्षिकांमुळे जनजागृतीस मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख नागेश रोठे, संभाजीराव शिंदे, राजू जोगदंड, प्रसाद काटले, आकाश दाभाडे, यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post