कधी वीज खंडित, ट्रिपिंग तर कधी पाईपलाईन फुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांचा नगरपरिषदेकडे खडा सवाल

नागरिकांना परळी पुरवठा व्हावा यासाठी सुपरवायझर सुरज सिंह ठाकूर ही नेहमी धडपड करीत असतात परंतु वरिष्ठांकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने ते देखील हातभार होतात अशी चर्चा आहे


शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कधी विद्युत पुरवठा खंडित होणे, तर कधी वारंवार ट्रिप होण्याच्या प्रकारांमुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा परिणाम होत आहे. याशिवाय ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्याच्या घटनाही समोर येत असल्याने नागरिकांना वेळेवर आणि सुरळीत पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्यांकडे पाणीपुरवठा सभापती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, असा खडा सवाल नागरिकांनी नगरपरिषदेकडे उपस्थित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post