श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ संपन्न
खामगांव - श्री यमुना महिला सत्संग मंडळ तथा श्री मदनमोहन मंदीर खामगांव द्वारे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञाचे आयोजन स्थानिक श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगांव येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. श्रीमद् भागवत कथा दि. ६.६.२०२६ ते दि. १२.६.२०२६ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ दि. १३.६.२०२६ रोजी करण्यात आला. कथा प.पु.गोस्वामी १०८ श्री वागधीशरायजी महोदयश्री (विशालबाबा) चेन्नई यांच्या अध्यक्षतेखाली व कथा वाचन वेदांताचार्य श्री गिरीराजजी शास्त्री बडौदा यांनी केले. दि.१३.६.२०२६ रोजी श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ आयोजन करण्यात आले होते या महायज्ञाचे मुख्य सेवार्थी श्री रमेशचंद्र लक्ष्मीनारायणजी राठी हे होते.
अधिक जेष्ठ मास निमित्त श्री मदनमोहन मंदिर हवेली सराफा खामगाव येथे विविध मनोरथाचे दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला. व्यास पुजन तथा कथा प्रारंभ, परिक्षीत संवाद, नृसिंह अवतार, वामन अवतार, राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, श्री गिरीराजजी उत्सव, श्रीकृष्ण रूख्मीनी विवाह, श्री सुदामा चरित्र, श्री पुरूषोत्तम सहस्त्र नाम महायज्ञ आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वीतेकरीता नंदकिशोर गोयनका, सतिषभाई सांगाणी, उमेशभाई बरालीया, सौ. निशा कृष्णकांत भट्टड, सौ. चंचल प्रमोद चांडक, सौ. ममता विपुल जोबनपुत्रा यांनी परिश्रम घेतले. श्रीमद् भागवत सप्ताहात जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेतला होता. श्री यमुना महिला सत्संग मंडळ व श्री मदनमोहन मंदीर हवेली खामगांव तर्फे कथेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. उपरोक्त माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.



Post a Comment