खामगावात भाजप शहर महिला आघाडीची बैठक संपन्न; ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या तयारीसह विविध योजनांवर मार्गदर्शन


खामगाव:- भारतीय जनता पार्टीच्या खामगाव शहर महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्षा सारिकाताई डागा यांच्या नेतृत्वाखाली तर नगराध्यक्ष अपर्णाताई फुंडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत दि. २८ जून रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मसंदर्भात नियोजन करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीला भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष भाग्यश्रीताई मानकर ,मनीषा माटे, रुपाली गायगोळ, ज्योती भुसारी, नीलिमा डोरले, अर्चना लोखंडे, सुनीता पानझाडे,ज्योती आमले, वराडे ताई यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बैठकीत संघटन बळकटीकरण, महिला सक्षमीकरण आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post