"मुलींच्या हाती पशुधनाला संजीवनी"
एसव्हीजीआय कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थिनींचा वढशिंगी येथे अभिनव उपक्रम
जळगाव : पशुधनाचे आरोग्य सुदृढ राखून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने SVGI College of Agriculture च्या विद्यार्थिनींनी वढशिंगी येथे "पशुधन संवर्धन व लसीकरण" हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन, शेतकऱ्यांशी समन्वय, नोंदणी तसेच लसीकरणाची जबाबदारी विद्यार्थिनींनी प्रभावीपणे सांभाळली.
उपक्रमांतर्गत गायी, म्हशी, वासरे तसेच इतर पाळीव जनावरांना विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यासोबतच पशुपालकांना जनावरांच्या आरोग्य तपासणीबाबत तसेच संतुलित आहार व योग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील वानखेडे (सरपंच, वढशिंगी), डॉ. उदय देशमुख (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, जळगाव), डॉ. सुनील तळेकर (पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार), डॉ. गणेश खुपसे (पशुधन पर्यवेक्षक, जळगाव), डॉ. श्वेता पाटील, डॉ. सोमेश गायकवाड, श्री. अमोल फाळके, श्री. राजदीप गायकवाड, श्री. पियुष कवडेकर, श्री. ऋषिकेश गावडे, श्री. सुपेश मोरोडे, डॉ. विनोद भानोतकर (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव), प्रा. अविनाश आटोळे (कार्यक्रम अधिकारी), प्रा. प्रमोद इढोळे (कार्यक्रम समन्वयक) व प्रा. नम्रता खिरेडकर (विषय तज्ज्ञ) उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या सामाजिक बांधिलकीचे व कार्यतत्परतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे पशुपालकांमध्ये जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment