खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांची वाशिम येथे एसडीपीओपदी प्रमोशन
खामगाव : खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांची वाशिम येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या बदलीचे आदेश मलकापूर येथे झाले होते. मात्र, प्रशासनाने सुधारित आदेश काढत त्यांच्याकडे वाशिम येथील एसडीपीओ पदाची जबाबदारी सोपविली आहे.
रामकृष्ण पवार यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून नागरिकांशी समन्वय राखणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

Post a Comment