लायन्स डिस्ट्रिक्ट 3234-H2 चा "सूर्योदय" जिल्हा कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळा दिमाखात संपन्न
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी MANTHAN एम.आय.टी. ऑडिटोरियम हॉल, छत्रपती संभाजीनगर येथे लायन्स डिस्ट्रिक्ट 3234-H2 चा "सूर्योदय" जिल्हा कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळा अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन दत्तात्रेय राहुल ओसेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.
लया सोहळ्याचे मुख्य अतिथी व इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून लायन्स इंटरनॅशनलचे पास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट तथा LCIF चेअरपर्सन लायन ए. पी. सिंह (कोलकाता) उपस्थित होते. त्यांनी जिल्हा कॅबिनेटच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत प्रेरणादायी आणि प्रभावी शैलीत पदाची शपथ दिली.*
*आपल्या प्रेरणादायी भाषणात लायन ए. पी. सिंह म्हणाले, "मी देखील तुमच्यासारखाच एक सामान्य लॉयन आहे. सेवा, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर कोणताही लॉयन लायन्स इंटरनॅशनलच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचू शकतो. पदापेक्षा सेवाभाव मोठा असतो."त्यांनी सर्व सदस्यांना अधिकाधिक सेवा प्रकल्प राबविण्याचे, नवीन सदस्य जोडण्याचे, LCIF ला बळकटी देण्याचे आणि "WE SERVE" या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजसेवा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांनी, प्रसंगांनी आणि विनोदी शैलीने संपूर्ण सभागृह भारावून गेले.*
*"सूर्योदय" ही या सोहळ्याची संकल्पना नव्या नेतृत्वाची, नव्या ऊर्जेची, नव्या विचारांची आणि मानवसेवेप्रती अखंड समर्पणाची प्रतीक ठरली. प्रत्येक नवीन कार्यकाळ हा समाजसेवेच्या नव्या संकल्पांसह सुरू होतो, हा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला.*
*यावेळी जी. एस. होरा LCIF TRUSTEE (गेस्ट ऑफ ऑनर), PID लायन डॉ. नवल मालू, इंटरनॅशनल एंडोर्सी लायन राजेंद्र मुच्छल, प्रेरणास्थान लायन राजेंद्र बाबू दरडा EDITOR-IN-CHIEF, MUNISH SHARMA CHAIRMAN, IPDG लायन अश्विनकुमार के. बाजोरिया, फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन योगेशकुमार जायसवाल, सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुप्रिया कोतवाल, सर्व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, जिल्हा पदाधिकारी, रीजन व झोन चेअरपर्सन्स, जिल्हा लिओ चेअरपर्सन लायन डॉ. प्रदीप गरगे, जिल्हा लिओ प्रेसिडेंट, मायक्रो कॅबिनेट तसेच विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने लॉयन सदस्य उपस्थित होते.*
कार्यक्रमादरम्यान LCIF देणगीद्वारे अनेक MJF व PMJF सन्मान जाहीर करण्यात आले तसेच अनेक नवीन लायन्स क्लबांना चार्टर प्रदान करण्यात आले.डिस्ट्रिक्ट LCIF कॉऑर्डिनेटर लायन मुरलीधर उपाध्याय यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष PMJF लायन नरेश चोपडा, झोन चेअरपर्सन MJF लायन वीरेंद्र आर. शाह तसेच कॅबिनेट ऑफिसर MJF लायन राजकुमार गोयंका यांनी पर्यावरण संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या "कार गार्बेज बॅग" या उपक्रमाचे मुख्य अतिथी व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून भेट दिली.
लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या किरण नरेश चोपडा या MJF झाल्या. झोन चेअरपर्सन वीरेंद्र शाह व रीजन चेअरपर्सन अनिता उपाध्याय यांच्या हस्ते एक नवीन महिला क्लब "लायन्स क्लब सौराष्ट्र क्वीन" चे चार्टर प्रदान करण्यात आले.जिल्हा पीआरओ लायन अतुल लड्ढा व त्यांच्या टीमने जिल्हा डायरेक्टरीचे आकर्षक व आधुनिक पद्धतीने सादरीकरण केले, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कन्व्हिनर लायन सुनीता मालपानी व सह-कन्व्हिनर लायन नंद किशोर मालपानी तसेच संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन करण्यात आले.शेवटी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन दत्तात्रेय राहुल ओसेकर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन जितेंद्र महाजन आणि डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर लायन मोरेश्वर कुलकर्णी यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ही बातमी लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे पीआरओ MJF लायन राजकुमार गोयंका यांनी प्रसिद्धीस दिली



Post a Comment