संज्योत खंडारे टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम 

खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील संज्योत संतोष खंडारे , यांची भारत टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून भारतातील नामांकित संस्था इसरो बंगलोर येथे सहली साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

सदर विद्यार्थी एंझोकेम highschool येवला, येथे 8 या वर्गात शिकत आहें.संज्योत हा, कालेगाव येथील श्रीकृष्ण तोताराम खंडारे, मुख्याध्यापक यांच्या लहान्या बंधुचा मुलगा असून, वाडी येथील संतोष चव्हाण व अंतरज येथील संगम वानखडे व सागर वानखडे यांचा तो भाचा आहे संज्योत ने सांगितले की भविष्यामध्ये उच्चशिक्षित होऊन देशसेवा आणि समाजसेवा कार्य करण्याचा माझा संकल्प आहे

सदर यशाबद्दल संज्योत चे खामगांव तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून त्यावर अभिनंदनचा वर्षाव होतआहे

Post a Comment

Previous Post Next Post