कर्णबधिर विद्यार्थ्यांनी रचला पालखी व रिंगणाचा सोहळा

खामगाव : स्थानिक श्रीराम एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांद्वारा पालखी व रिंगण सोहळ्याचे प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा प्रसंग विद्यालयातील मुख्याध्यापक डॉ. प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख श्रीमती संगीता शिंदे यांच्या प्रयत्नातून व सर्व विशेष शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने विद्यालयातील मुलांनी श्री.विठ्ठल रुक्मिणी व वारकरी यांच्या वेशभूषेमध्ये विठ्ठलाचे दर्शन घडून आले तसेच प्रत्यक्षरीत्या दिंडी सोहळा, पालखी सोहळा व रिंगण सोहळा इत्यादींचे महत्व सांगितले व सर्व गोष्टी अनुभव करता आल्यामुळे विद्यालयात आज भक्तीमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.



Post a Comment

Previous Post Next Post