अग्रवाल महिला मंडळ तर्फे तीन दिवसीय महिला कार्यक्रमाचे आयोजन
अग्रवाल महिला मंडळ आणि बहू मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथील अग्रसेन भवन येथे ११, १२ आणि १३ जुलै रोजी ५० वर्षांवरील महिलांसाठी तीन दिवसीय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत दररोज विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी खुद से खुद की पहचान, दुसऱ्या दिवशी आधुनिकता की ओर आणि तिसऱ्या दिवशी लव्ह यू जिंदगी या तिन्ही कार्यक्रमांमध्ये महिलांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
यावेळी सर्व सहभागी महिला आणि समर्थकांचे अग्रवाल महिला मंडळ व बहू मंडळ तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
إرسال تعليق