पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत ८०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


कोठाळी, ता. मोताळा, जि. बुलढाणा :लायन्स क्लब ऑफ खामगाव संस्कृतीच्या वतीने २९ ऑगस्ट २०२६ रोजी कोठाळी येथील जनता विद्यालयात सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत पक्षी संवर्धक आणि पक्षी प्रेमी श्री. संजय गुरव यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची पद्धत तसेच पर्यावरणाचे संरक्षण, जलप्रदूषण टाळणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



या अभिनव उपक्रमात एकूण ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कोपर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या उपक्रमासाठी झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ.विरेंद्र शाह, अध्यक्ष पीएमजेएफ लॉ.नरेश चोपडा, सचिव लॉ.दिव्या अग्रवाल, ट्रेझरर लॉ.डिंपल शाह तसेच पक्षी संवर्धक आणि पक्षी प्रेमी श्री. संजय गुरव यांचे विशेष योगदान लाभले.  वरील माहिती पीआरओ लॉ.राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post